Share

लॉकडाऊन उठल्यानंतर कामगार वर्गा समोर उभ्या राहणार ‘या’ समस्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेले लॉकडाऊन उठवल्यानंतरही मजूर कामगारांचा प्रश्न सुटणार नाही. तर त्यांच्या समोर नवीन उभ्या राहतील, असे विधान आर्थिक क्षेत्रातील तज्ञांनी केले आहे. लॉकडाऊननंतर मजूर आणि स्थलांतरीत कामगारांसमोर आणखी समस्या वाढणार आहेत, असा अंदाज तज्ञांनी बोलून दाखवला आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येकजण आपल्या रोजगाराबाबत प्रयत्न करेल. आपली आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी प्रत्येक कामगार  कामाच्या शोधात  असेल. त्यामुळे बाजारात कामगारांची आणि मजुरांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असेल. त्यामुळे अशावेळी कामगारांचे शोषण होण्याची शक्यता अधिक असते.

लॉकडाउननंतरच्या जगात कामाचे तुटीचे क्षेत्र आणि कामाचे अतिरिक्त क्षेत्र” असतील. कामाच्या उरलेल्या भागात, परिस्थिती अत्यंत भीषण होईल. कारण तुलनेने उच्च कौशल्य असणार्‍या कामगारांची भरती  केली जाईल आणि त्यातूनचं शोषणाला सुरवात होईल, अशी माहिती लैबोरनेट सर्व्हिसेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि सह-संस्थापक गायत्री वासुदेवन यांनी दिली.

भविष्यात भीतीदायक परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. भारतात आज 90 % लोक हे अनौपचारिक क्षेत्रात काम करतात. मात्र या कामगारांसाठी कोणतेच कायद्याचे संरक्षण नाही. त्यामुळे  सक्तीच्या मजुरीवरील ताण आणखी भारी होऊ शकेल आणि कामगारांना बिना वेतनावर ओव्हरटाईमवर काम करावे लागेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!