Share

महिनाभरात सरकारी बंगला रिकामा करा, प्रियंका गांधी वाड्रा यांना नोटीस

Published On: 

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका वाड्रा यांना गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने मंत्रालयाने एका महिन्याच्या आत बंगला रिकामा खाली करण्यास सांगितलं आहे. या नोटिसमध्ये प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्टपर्यंत लोधी इस्टेट येथील बंगला रिकामा करण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे.

मान्सुनबाबत खोटा अंदाज; हवामान खात्यातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची स्वाभिमानीची मागणी

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार यांनी पाठवलेल्या अधिकृत पत्रात, प्रियंका वाड्रा यांना आता एसपीजी सुरक्षा नसल्याने त्या राहत असलेला दिल्लीतील लोधी रोडवरील बंगला रिकामा करावा. असं म्हटलं आहे.

मागील वर्षी प्रियंका वाड्रा यांची विशेष सुरक्षा काढून त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली होती. नियमांनुसार सुरक्षा व्यवस्था पुरवताना विशेष सुरक्षा पुरवली जाईल त्याला सरकारी बंगल्याची तरतूद आहे. मात्र, झेड सुरक्षा व्यवस्थेत सरकारी निवासस्थानाची तरतूद नाही. याचाच आधार घेऊन प्रियंका गांधी यांना ही नोटीस देण्यात आली आहे.

दिलासादायक : पुण्यात अ‍ॅन्टीजेन किटच्या वापरला सुरुवात !

सरकारी आदेशानुसार प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्ट 2020 पूर्वी हा सरकारी बंगला सोडावा लागेल. त्यांना देण्यात आलेल्या अधिकृत नोटीसमध्ये त्यांनी निश्चित वेळेत बंगला रिकामा न केल्यास त्यांना आर्थिक दंडही होऊ शकतो.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!