Share

दिलासादायक : पुण्यात अ‍ॅन्टीजेन किटच्या वापरला सुरुवात !

Published On: 

पुणे : डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय येथे कोरोना-१९ बाधित रुग्णांवर त्वरीत उपचारासाठी आवश्यक असलेल्या अ‍ॅन्टीजेन किटच्या वापरास सुरुवात करण्यात आली. सदर प्रसंगी उपमहापौर सौ. सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, आयुक्त शेखर गायकवाड, डॅा. रामचंद्र हंकारे व डॉ. अंजली साबणे, सहाय्यक आरोग्य प्रमुख आणि रुग्णालयातील इतर डॉक्टर्स व सेवक उपस्थित होते.

कराचीतील दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात – इम्रान खान

कोविड-१९ बाधेसाठी आताच्या घडीला आर.टी.पी.सी.आर. ही एकमेव निदान चाचणी आहे. या चाचणीसाठी आर.टी.पी.सी.आर. मशीनरी/ट्‌ुनॅट/सी.बी.नॅटव्दारे तपासणीसाठी लागणारा वेळ आणि एकावेळी केवळ एक ते चार मर्यादेत होणा-या तपासण्या तसेच कार्टीजची अनुपलब्धता व जास्तीची किंमत ही या चाचणीची उणे बाजू आहे.

कोविड बाधेची निश्चिती लवकरात लवकर होण्यासाठी अनेक प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. आता आय.सी.एम.आर. ने तपासणीअंती Standard Q Covid-19 Ag detection kit व्दारे SARS-COV-2 चे अ‍ॅन्टीजेन निदान होत असल्याचे खातरजमा केलेली आहे. या टेस्टमुळे निगेटिव्ह निदान करण्याचे प्रमाण ९९.३ ते १०० टक्के आहे. तर पॉझीटिव्ह निदान चे प्रमाण ५०.६ ते ८४ टक्के (रुग्णाच्या शरीरातील व्हायरल लोड नुसार) आहे. त्यामुळे अत्यंत तातडीच्या प्रसंगी ही किट वापरुन निदान करता येणे शक्य असल्याने कोविड-१९ साठी रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यास आय.सी.एम.आर सह ऑल इंडीया इन्स्टीटयुट ऑफ मेडीकल सायन्सनेही तपासणीअंती Standard Q Covid-19 Ag Detection kit किटला मान्यता दिलेली आहे.

या टेस्टचा वापर कंन्टेंमेंट झोन/हॉटस्पॉटमध्ये वैद्यकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली करता येणे शक्य आहे. फ्लू सदृश्य लक्षणे असलेल्या तसेच अतिजोखमीच्या व्यक्तींच्या संपर्कातील लक्षणे नसलेल्या व इतर हृदय विकार/ फुफ्फुस/ यकृ त/ मुत्रपिंड विकार/ मधुमेह तसेच रक्तदाब इ. विकार असलेल्या त्याचप्रमाणे केमो थेरपी, एचआयव्ही पॉझीटीव्ह, अवयव प्रत्यारोपण केलेले किंवा वयोवृध्द व्यक्तींवर तसेच गरोदर महिलांवर तातडीने उपचारासाठी/ रुग्णालयामध्ये आंतररुग्ण भरतीसाठी तातडीची चाचणी म्हणून या रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट चा उपयोग करणे शक्य आहे.

फी वाढी संदर्भात महाविकास आघाडी सरकारची शिक्षण सम्राटांशी छुपी हातमिळवणी – अतुल भातखळकर

ही चाचणी रुग्ण असलेल्या जागेवर, निदानासाठी स्त्राव घेतल्यानंतर एक तासाच्या आत व वैद्यकीय अधिका-याच्या निरिक्षणाखालीच करणे शक्य असल्याचे आसीएमआर ने त्यांच्या मार्गदर्शीकेमध्ये नमूद केलेले आहे. तसेच या चाचणीचे निदान केवळ १५ व जास्तीत जास्त ३० मिनिटात होत असल्याने कोणत्याही बाहय उपकरणांशिवाय नुसत्या डोळयाने करता येणे शक्य आहे. या बाबी लक्षात घेता पुणे शहरातील कोविड-१९ संबंधी उपचार करणा-या रुग्णालयांमध्ये तातडीच्या उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट चा उपयोग करण्यास पुणे महानगरपालिकेतर्फे सुरुवात करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!