🕒 1 min read
मुंबई : निवडणूक आयोगाकडून मोठी बातमी आली आहे. कोरोनामुळे विधान परिषदेच्या 9 जागांसाठी रखडलेल्या निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतचा प्रस्ताव टाकला होता. यावर आता निवडणूक आयोगानेही हालचाल केली आहे. तर आता 21 मेला विधान परिषदेची निवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत पेच निर्माण झाला होता. त्यातच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला. तर मुंबईत 21 मेला विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका घेताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सुरक्षितता देखील घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
Elections to the Legislative Council (MLCs) in Maharashtra will be conducted on May 21 in Mumbai: Election Commission of India (ECI) https://t.co/fWQZXcNola
— ANI (@ANI) May 1, 2020
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 9 जागांवर निवडणुका घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील 9 विधानपरिषद जागांवर प्रलंबित असलेल्या निवडणुकांशी संबंधित बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राच्या मुद्यावर निवडणूक आयोगाची दिल्लीत मोठी बैठक सुरू होती. या बैठकीत अमेरिकेवरून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त सामील झाले होते. दोन्ही निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगात हजर होते.
या बैठकीत महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली. खरंतर, उद्धव ठाकरे 28 मे पर्यंत आमदार झाले नाहीत तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

