Share

निवडणूकीचं बिगुल वाजलं, राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जूनला मतदान

Published On: 

नवी दिल्ली : राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. कोरोना संकटामुळे ही निवडणूक रखडली होती. आधी ही निवडणूक २६ मार्चला होणार होती. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता.

राज्यसभेच्या ५५ जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. अर्ज मागे घेण्याची मुदत १८ मार्चला संपली. मुदत संपली त्यावेळी ५५ पैकी ३७ जागांसाठी प्रत्येकी १ उमेदवारी अर्ज आला होता तर १८ जागांसाठी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आले होते. निवडणूक आयोगाने अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ३७ जागांसाठी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आणि १८ जागांसाठी निवडणूक जाहीर केली. ही निवडणूक २६ मार्चला होणार होती पण आता ही निवडणूक १८ जून रोजी होणार आहे.

आता लॉकडाउनमध्ये मोकळीक दिली जात असल्याने निवडणूक आयोगाने या जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की निवडणुकीची व्यवस्था करताना कोरोनाच्या प्रतिबंधांसंदर्भातील नियमांचे पालन व्हावे, यासाठी मुख्य सचिवांना एका वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती करण्यास सांगण्यात आले आहे.

दिलासादायक : कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले

यात आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या प्रत्येकी ४ जागा, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या प्रत्येकी 3 जागा, झारखंडच्या २ आणि ईशान्येकडील राज्यांतील मेघालय आणि मणिपूरच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या जागांसाठी १९ जूनला सकाळी ९ वाजता मतदान सुरू होईल.

दरम्यान, महाराष्ट्रातील सात जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार होती. मात्र सर्व सात जागांसाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्यामुळे राज्यातील सर्व जागांवर बिनविरोध निवड झाली. निवडणूक आयोगाने ही घोषणा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर जाहीर केली. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ जाहीर होण्याआधीच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीचा ‘सस्पेंस’ संपला होता.

…अन्यथा पुन्हा राज्यपालांकडे बैठक लावू – देवेंद्र फडणवीस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!