Share

एकनाथ शिंदेंची नियत साफ नाही ; मनसेचा घणाघात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे कल्याण – डोंबिवली महानगर पालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यासाठी प्रचंड आग्रही आहेत.यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांची आणि अजित पवारांची भेट घेतली होती. त्यावर प्रतिक्रिया देतांना राजू पाटील म्हणाले की २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याबाबत नियत साफ दिसते आहे. मात्र शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्र्यांची नियत साफ दिसत नसल्याचे सांगत राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सरळ – सरळ निशाणा साधला आहे.

राजू पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे जेव्हा डोंबिवलीत गुलाबी रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा मी २७ गावांबाबत स्थानिक लोकांच्या मनातील भावना सांगितल्या होत्या. यानंतर उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या भावना असतील, नक्कीच तर २७ गावांचा निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्र्यांना दिले होते असं राजू पाटील यांनी यावेळी सांगितले.

मात्र अजूनही निर्णय न घेतल्यामुळे २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याबाबत उद्धव ठाकरे यांची नियत साफ दिसत आहे. परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची तशी नियत दिसत नसल्याचे सांगत राजू पाटील यांनी टीका केली आहे. त्याचप्रमाणे येत्या आठवड्यात उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट घेणार असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.

२७ गावे नगरपालिका हद्दीतून वगळण्याच्या मागणीकरिता उच्च न्यायालयात दाखल केलेल्या तीन याचिका न्यायप्रविष्ट आहेत. तत्कालीन भाजप सरकारने २०१५ पासून समितीला गावे वगळण्यात येतील, असे आश्वासन दिले. न्यायालयात जो निकाल लागेल तो लागेल. मात्र गावे वगळली जातील असे सांगण्यात येत होते. राज्यात सत्ता परिवर्तन झाले. भाजपा सरकारने आधी गावे समाविष्ट केली. त्यानंतर ती वगळण्याचे आश्वासन दिले. मात्र शिवसेनेची भूमिका ही गावे वगळण्याची नव्हती. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या सोबत काँग्रेस व राष्ट्रवादी सहभागी आहे.आता यावर काय निर्णय घेतला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!