Share

‘नानासाहेब फडणवीसांचं बारभाई कारस्थान’ पुस्तक लवकरच लिहिणार – एकनाथ खडसे

Published On: 

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार तोफ देखील डागली आहे.

‘नानासाहेब फडणवीसांचं बारभाई कारस्थान’ पुस्तक लवकरच लिहिणार आहे. देवेंद्र फडणवीस मनीष भंगाळेला का भेटले?, त्यामागे त्यांचा हेतू काय होता? अंजली दमानिया यांच्या आरोपांमागे नेमकं कोण? या सगळ्यांची माहिती पुराव्यासह माझ्याकडे आहे. अस एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी या जिल्ह्याचे ‘राजे’ पोहचले थेट बांधावर

देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करू शकत नाही. कारण मुहुर्त साधत लग्न करून शपथ घेत तीन चार दिवस संसार करत ते मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाले होते. तीन-चार दिवस दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर पतिव्रता आहोत, असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण आता नैतिकता घालवल्या गेली आहे, अशा परखड शब्दांत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस एकटेच लढत असून महाराष्ट्रभर फिरत आहे. पूर्वी आमचं टीम वर्क होतं. त्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर नितीन गडकरी यांच्या तोफ चालयचा तर अलीकडे माझासह पंकजा मुंडे, गिरीश बापट, विनोद तावडे, हरिभाऊ बागडे असा आमचा एकत्र ताफा होता. त्यामुळे सरकार घाबरून गांगारून जायचं. मात्र, आता महाराष्ट्रातली सर्व नेते मंडळी शांत बसलेली आहेत. जनतेनं निवडून दिलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते अधून मधून बोलतात. मात्र जी आक्रमक भाषा पाहिजे, ती त्यांच्या कुठेच दिसत नाही. आम्ही कमी पडत आहोत, असं मतही एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी आमदार शिवेंद्रसिंह राजेंचा मोठा पुढाकार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!