Share

खतात राख मिसळली जातेय, कृषीमंत्र्याचा धक्कादायक आरोप

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या कृषी खात्यातून धक्कादायक वृत्त येत आहे. मिश्र खतांमध्ये राख मिसळली जात असल्याचा गंभीर आरोप खुद्द कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला मातीमोल करण्याचे काम खत निर्मिती कंपन्यांकडून होत आहे.

बियाणं जर उगवलं नाही तर शेतकऱ्याचं वर्ष वाया जाते. त्यामुळे हा विषय खूप गंभीर असून शासन याबाबत कारवाई करणार आहे. याबाबत डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, खात कंपन्यांकडून मिश्र खतांमध्ये राख मिसळली जात आहे. त्यामुळे हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे. कारण बियाणं जर उगवलं नाही तर शेतकऱ्याचं वर्ष वाया जाते.या बोगस खतांच्या विक्रीविरोधात कडक कारवाई होणार आहे. तसेच यापुढे ज्या जिल्ह्यात असा प्रकार आढळेल त्या जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्याचं पथक धाड टाकणार आहे, अशी माहिती डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.

दरम्यान असे प्रकार आढळून आल्यास शेतकऱ्यांनी थेट माझ्या नंबरवर माहिती द्यावी. ती माहिती गुप्त ठेवून तातडीने भरारी पथक पाठवून छापा मारण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी दिली.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!