🕒 1 min read
मुंबई : भटक्या विमुक्त समाजाला मिळाणारे पदोन्नतीतील आरक्षण असंवैधानिक असल्याचे प्रतिज्ञापत्र महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात दिले आहे. त्यामुळे भटका विमुक्त समाज पदोन्नतीतील आरक्षणापासून वंचित होणार आहे. याचा वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात वंचितकडून येत्या १७ ऑक्टोबर रोजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात येणार आहे.
राज्यात भटक्या-विमुक्त नागरिकांसाठी व कर्मचाऱ्यां साठी नोकऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात ५ टक्के आरक्षण दिले जाते. हे आरक्षण भटक्या-विमुक्तांना पदोन्नतीसाठी देखील लागू होते. परंतू आता २९ सप्टेंबरला आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये या पदोन्नतीतील आरक्षणा विरुध्द प्रतिज्ञापत्र दिले आहे. भटक्या विमुक्त कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये दिले जाणारे आरक्षण असंवैधानिक आहे असे प्रतिज्ञापत्रं आघाडी सरकारने कोर्टात दिले आहे. सरकारच्या या भूमिकेच्या निषेधार्थ रविवारी सकाळी ११ वाजता वंचित बहुजन आघाडीने धनंजय मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थाना बाहेर निषेध आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
भटके विमुक्त हा समुह सामाजिक दृष्ट्या अतिशय मागासलेला व दुर्बल आहे. आर्थिक दृष्ट्या शोषित वंचित आहे. असे असताना गोरगरीब व प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करणाऱ्या भटक्या-विमुक्त समाजातील कर्मचाऱ्यावर हा मोठा अन्याय आहे. अगोदरच देशांमध्ये भटक्या-विमुक्तांची सूची ही फक्त महाराष्ट्रातच आहे. देशातील विविध राज्यात महाराष्ट्रातील भटके विमुक्त भारत सरकारच्या एससी, एसटी आणि ओबीसीमध्ये या समुहाचा समावेश केलेला आहे.
या नवीन निर्णया मुळे महाराष्ट्र सरकारने भटक्या विमुक्तांवर घोर अन्याय केलेला आहे. जे तुटपुंजे आरक्षण मिळत होते त्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी जी पदोन्नती दिली जात होती त्या पदोन्नती मध्ये असणारे आरक्षण उठविण्यासाठी सुप्रीम कोर्टात आघाडी सरकारने प्रतिज्ञापत्र दिलेले आहे, असं वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची करडी नजर?; पुराव्यासह केला आरोप
- ‘जर धोनी भाई खेळत नसेल तर…’, सुरेश रैनाचा आयपीएल निवृत्ती योजनेबद्दल मोठा खुलासा
- आरसीबी फक्त 10 खेळाडूंसह खेळत होता; परभावानंतर सेहवाची संघावर टीका
- ‘अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय, महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो’
- ‘हा प्रश्न मला विचारू नका’ म्हणत चालू मुलाखतीतून माईक फेकून मलिक निघून गेले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
