नवी दिल्ली : भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियन कसोटीत विराट कोहली (Virat Kohli) आणि पंच यांच्यात मोठा वाद झालेला पाहायला मिळाला. या सामन्यात भारतीय संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेला 305 धावांचे लक्ष्य दिले होते. सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिका त्यांचा दुसरा डाव सुरू करत असताना विराट कोहली पंचांशी वाद घालताना दिसला. हा वाद नव्या चेंडूबाबत होता.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे सलामीवीर दुसऱ्या डावाला सुरुवात करण्यासाठी मैदानात आले होते. टीम इंडियाचे खेळाडूही मैदानात आले होते. त्यानंतर कोहलीने खेळ थांबवला आणि त्याला दिलेला चेंडू जुना असल्याचे सांगितले. यादरम्यान कोहलीने सांगितले की, मला चेंडू निवडण्याची संधी दिली गेली नाही. या संपूर्ण वादात सुमारे 10 मिनिटे वाया गेली.
यानंतर अंपायरने नवीन चेंडूचा बॉक्स मागवला आणि टीम इंडियाला चेंडू निवडण्यास सांगितले. यादरम्यान कोहलीसोबत फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज दिसले. कोहली आणि अश्विनने सर्व चेंडूंची पकड आणि सीम तपासले. यापैकी अश्विनने एक चेंडू निवडला आणि त्याच्यासोबतच सामना सुरू झाला.
दरम्यान, भारतीय दिग्गज सुनील गावस्कर कॉमेंट्री करत होते. त्यांनी सांगितले की प्रत्येक चेंडूचा आकार, रंग आणि वजन खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकामध्ये मोठा फरक आहे. यामुळेच टीम इंडिया आपल्या आवडीच्या नव्या चेंडूच्या शोधात होती. गावस्कर म्हणाले की, आमच्या काळात फक्त कपिल देवच चेंडू निवडायचे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्याचं कुटुंबप्रमुख असलेलं मायबाप सरकार खरचं आपली जबाबदारी निभावतय का?’
- नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत याचं पोलिसांनी भान ठेवायला हवं- प्रविण दरेकर
- “…तर महाराष्ट्रालाही कठोर निर्णय घ्यावेच लागतील”,शिवसेनेचा इशारा
- महात्मा गांधींबद्दल ‘ते’ वक्तव्य आले अंगलट; कालीचरण महाराजांना अटक
- नसिरुद्दीन शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र; म्हणाले…


