Share

शिवरायांचे धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे – डॉ. भारत पाटणकर

Published On: 

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी परंपरेला शोभेल असा संघर्ष करावा. चारशे वर्षांपूर्वी सरंजाशाहीमुळे संकटात सापडलेल्या जनतेला पेचातून सोडविण्यासाठी शिवरायांनी जे धोरण राबविले, तेच धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे, जनतेच्या उठावाचे नेतृत्व त्यांनी करावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले.येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते.

जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी मार्गदर्शनाची व सहकार्याची गरज आहे, त्या ठिकाणी आम्ही करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.डॉ. पाटणकर म्हणाले, सातारा जिल्ह्यातील जनतेला छत्रपती शिवराज, छत्रपती शंभूराजे आणि शंभूपुत्र शाहूहाराज यांची दैदीप्यमान परंपरा लाभली आहे. सरंजादार, जीनदारांपासून रयतेला मुक्त करण्याचे कार्य करण्याचा वारसादेखील आहे. शिवरायांनी जातीय शोषणाच्या उतरंडीला आव्हान देऊन अगदी तळातील जातींनाही सन्मानाने जगण्यासाठी परिसर तयार केला. स्त्रियांना मुक्तपणे आणि निर्भयपणे जगता येणारी सामाजिक परिस्थिती तयार केली. हा वारसा जपण्याची जबाबदारी छत्रपतींचे वंशज आणि सातारकर जनतेचीदेखील आहे. या जबाबदारीला तडा पडेल, अशा घटना इथून पुढे घडू नयेत, याची काळजी दोघांनीही घ्यायला हवी. आज देशातील कष्टकरी जनता संकटात आहे.बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शासनाच्या घोषणांमधून दुष्काळ नाहीसा होईल, असे वाटत नसल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. सार्वत्रिकपणे भयाच्या छायेखाली जनतेला ठेवले जात आहे. जातीभेदाचे राजकारण खेळून समाजात भिंती निर्माण केल्या जात आहेत. अशी परिस्थिती बदलून भयमुक्त पर्यावरण संतुलित आणि सर्व कष्टकरी जनतेच्या जीवनात समृद्धी आणणारा विकासाचा आराखडा राबविण्यासाठी, स्त्रीमुक्तीसाठी जनचळवळ उभारणे तातडीचे बनले आहे. वास्तविक, अशी चळवळ उभी करणे हेच छत्रपती शिवाजी हाराजांचा वारसा सांगणारे आहे. छत्रपतींच्या सर्व वारसांनी यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी डॉ. पाटणकर यांनी केले. पत्रकार परिषदेला डॉ. प्रशांत पन्हाळकर, चैतन्य दळवी, संतोष घोटल, यशवंत लावंड, जयसिंग कद आदींची उपस्थिती होती

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!