Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेस १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रवेश नोंदणीला १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत ३ हजार ६८७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली, तर ३ हजार २०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. परंतु अर्ज सबमिट केलेले नसल्याने ते अर्ज अपूर्ण आहेत.

सन २०२१-२२ च्या शैक्षणिक वेळापत्रकात ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन १ ऑक्टोबरपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होईल, असे शैक्षणिक नियोजन होते. विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद पाहून प्रवेश नोंदणीला आधी १० दिवसांची, तर आता पुन्हा ५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, यावर्षी अतिवृष्टीमुळे विद्यापीठातील शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी अधिसभेच्या बैठकीत जाहीर केला आहे.

शहरासह संलग्न महाविद्यालयांत प्रवेशाला अपेक्षित प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. विशेषतः विज्ञान शाखेचे प्रवेश वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशानंतरच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या प्रवेशांनाही मुदतवाढीचा निर्णय या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. १६ ऑक्टोबरला सायंकाळी पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर होईल. अंतिम गुणवत्ता यादी १६ ऑक्टोबर रोजी जाहीर करून २० ते २२ ऑक्टोबर पहिली प्रवेश फेरी होणार आहे.

विविध प्रवर्गातील रिक्त जागांसाठी २९ ऑक्टोबर रोजी स्पॉट अॅडमिशनसाठी विद्यार्थ्यांना निमंत्रित केले गेले आहे. अंतिम प्रवेश यादी ३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. १८ ऑक्टोबर आक्षेप, हरकती पदव्युत्तर विभाग मेलद्वारे स्वीकारणार आहे. त्यानंतर अंतिम प्रवेशयादी १८ ऑक्टोबरला सायंकाळी जाहीर होईल. शैक्षणिक वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रथम सत्र परीक्षांच्या वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता आहे, तर २५ ऑक्टोबरपासून पहिल्या सेमिस्टरचे वर्ग सुरू होतील, असे प्रकुलगुरू श्याम शिरसाठ यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!