Share

…म्हणून त्यांनी आपल्या पदावरून दूर व्हावं- शरद पवार

Published On: 

मुंबई : आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी भाष्य केले.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’लखीमपूर खेरीसंदर्भात जी माहिती बाहेर आली, त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की शांतपणे रस्त्याने जात असलेल्या शेतकऱ्यांच्या जमावावर काही लोक गाडीतून येतात, त्या लोकांना गाडीतून धक्के देतात आणि त्यात चार शेतकरी आणि इतर २-३ लोकांची हत्या होते. त्यात एक पत्रकार देखील होते. असा प्रकार कधी घडलेला नव्हता. असा प्रकार झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पैकी काहींनी स्पष्ट सांगितलं की केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे पुत्र त्या गाडीत होते. ते नाकारलं गेलं. त्यावर कारवाई करण्याची मागणी झाली. पण त्या मागणीला उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने दिला नाही. ८ दिवसांनंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना अटक करण्याची कारवाई पोलिसांनी केली. ते नव्हतेच, असं आधी सांगितलं जात होते, त्यांना भाजपाचेच सरकार असलेल्या उत्तर प्रदेश सरकारला अटक करावी लागली. त्यामुळे आवश्यक असलेला पुरावा त्यांच्या हाती लागलेला असावा हे स्पष्ट आहे

दरम्यान, ‘सत्ताधारी पक्षानं यात भूमिका घेणं आवश्यक होत. पहिल्यापासून यात सत्य नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. या प्रकरणात बघ्याची भूमिका घेण, अपराध्यासंबंधी वेळीच उपाययोजना न करणं याची जबाबदारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही. त्यामुळेच गृहखात्याची जबाबदारी राज्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे आहे, त्यांना अजिबात टाळता येणार नाही. म्हणून त्यांनी आपल्या पदावरून दूर व्हावं. त्यामुळे लोकांचा कायदा-सुव्यवस्था, शासनाबाबत विश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे,’ असेही यावेळी पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!