🕒 1 min read
मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतमाल, रस्ते, धरणं, पुल अशा सर्वच ठिकाणी फटका बसला आहे. आधी कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि नंतर मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांचे हातचे पिक गेले आहे. या सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिलाय. जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने १० हजार कोटींच्या अर्थसहाय्याची घोषणा केली.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होतीच. त्यानुसार मंत्रिमंडळाने १० हजार कोटींच्या अर्थसहाय्यास मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ५५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटातून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या माध्यमातून मदत केली जाणार आहे.
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले.#MahaCabinetDecision
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 13, 2021
या संदर्भात निश्चित रुपरेषा अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी, यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच पंचनामे न करता सरसकट मदत करण्याची मागणी देखील करण्यात येत होती. त्यानुसार या पॅकेजचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आघाडी सरकारला येणाऱ्या काळात सळो की पळो करुन सोडू; आशिष शेलार यांची डरकाळी
- राज्यात सप्टेंबरमध्ये १७ हजार १५० बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला – नवाब मलिक
- ‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची निर्घृण हत्या होणं सामाजिक अध:पतनाचं लक्षण’
- पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनाच सामूहिक प्रयत्न करावे लागतील – वळसे पाटील
- ‘खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची वीजेची गरज भागवली जात आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
