नवी दिल्ली : संपूर्ण देशात गेले महिनाभर लॉक डाऊन चालू आहे. नागरिकांनी घरी राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार केले जात आहे. यातच दुरदर्शन ने मात्र चांगली शक्कल लढवलेली दिसून येते. कारण मार्चच्या शेवटच्या महिन्यात दुरदर्शनने जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा सुरु करून TRP वर अधिराज्य पुन्हा प्रस्थापित केले आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात रामायण, महाभारत सह शक्तिमान, सर्कस, जंगल बुक या आणि अनेक मालिका चालू करण्यात आल्या होत्या. प्रेक्षकांनी देखील याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. अगदी लहान बालकांपासून, तरुणवर्ग ते जुने दिवस पुन्हा आठवून वयोवृद्ध देखील यात रममाण झाले आहेत. यातच दुरदर्शनने आता ट्विट करून आणखी एका जुन्या मालिकेच्या प्रसरणाची माहिती दिली आहे. हि मालिका आहे "श्री कृष्णा" . लवकरच दुरदर्शनच्या नैशनल चैनल वर हि मालिका सुरु होईल.
COMING SOON! #ShriKrishna on your favourite channel @DDNational. pic.twitter.com/kCIbTeBRoq
— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) April 25, 2020
सद्या रामायणातील “उत्तर रामायण” रात्री ९.०० वाजता व पुनःप्रसारण सकाळी ९.०० वाजता केले जाते. तसेच महाभारत दुपारी १२.०० वाजता व सायंकाळी ७.०० वाजता डीडी भरती वर प्रसरीत केले जाते. नेटफ्लिक्स, झी एंटरटेन्मेंट सह सर्वांनाच मागे टाकत दुरदर्शनने वर्चस्व निर्माण केले आहे. दरम्यान, कोरोनाचे संकट वाढत असून रुग्णांची संख्या हि देशभरात २४ हजार पाचशे च्या वर गेली आहे.


