Share

काळजी करु नका मला विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय हे माहीत आहे : उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना दिलासा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : पावसाळा संपला असला तरी गेल्या पंधरा राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी लोहा तालुक्यातील जानापूरी येथे शेतीवर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना पाहताच ”उद्धव साहेब शेतकऱ्यांना जगवा” असा टाहो शेतकऱ्यांनी फोडला.

परतीच्या पावसाने नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर लावलेल्या शेतात आजही गुडघाभर पाणी असून, पिकावर बुरशी चढली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना त्यांनी ”काळजी करु नका मला विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय हे माहीत आहे.; असं म्हणत त्यांनी विमा कंपन्यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. तसेच शेतकऱ्यांनी रडायचं नाही तर लढायचं. ” अशा शब्दांत ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीरही दिला. तर हेक्टरी २५ हजाराच्या मदतीची मागणी ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी आले हे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तुम्हीच आता काहीतरी करा आणि शेतकऱ्यांना वाचवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यानंतर ते पुढील गावात दौऱ्यासाठी निघून गेले. आता रडायचं नाही तर लढायचं असंही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1191665922341134337?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1191666268773838849?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!