🕒 1 min read
औरंगाबाद : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी ( दि. ९) राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. महाविकास आघाडी सरकार सोबत सत्ता उपभोगत असूनही राष्ट्रवादीच्या आमदाराने कठोर निर्बंधांना विरोध करणे बुचकळ्यात पाडणारे आहे.
आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाची ही लाट थोपविण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत किराणा, मेडिकल अशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने ५ ते ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाच्या विरोधात व्यापारी व सर्व सामान्य जनतेतून मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होत आहे.
या नव्या निर्बंधामुळे व्यापारी व सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या निर्बंधात लग्नासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र लग्नासाठी आवश्यक असणारे नवीन कपडे, दागिने, घरभांडी व इतर साहित्यांची दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लग्नासाठी खरेदी करायची कशी? असा प्रश्न वधु-वर पक्षासमोर उभा राहिला आहे.
तसेच उद्योग कंपन्यांना उत्पादन सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र कंपन्यांतील उत्पादने विक्री करणारी दुकाने आणि शोरूम बंद ठेवण्यात आली आहे. बांधकांमांना परवानगी आहे. परंतु बांधकामासाठी लागणारी साहित्यांची दुकाने मात्र उघडण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे बांधकाम करायचे कसे? असे अनेक बाबतीत झाले असून या नव्या निर्बंधामुळे मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे हे २५ दिवस काढायचे कसे? असा प्रश्न उभा राहिला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने सरसकट बंद करण्याऐवजी निवडक वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, त्यामध्ये कामगारांचे लसीकरण, आरटीपीसीआर चाचणी, मर्यादित संख्येनेच ग्राहकांना प्रवेश, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे असे निर्बंध आणता येतील. सरसकट २५ दिवस दुकान बंदीचा फेरविचार करावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वैजापूरच्या पोलिसांचा दारुच्या नशेत प्रताप!
- धक्कादायक! गावातील सप्ताहातून दोन दिवसांत ५५ जणांना कोरोना
- पंढरपुरात नियमांची पायमल्ली करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर काय कारवाई करणार; राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- केंद्रीय पथक शहरात दाखल होताच, पालिकेने केले असे काही!
- सचिन वाझेला दिलासा, एनआयए कोठडीतून सुटका तर न्यायालयीन कोठडीत रवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
