Share

‘ओबीसी समाजाचा फुटबॉल करू नका’; बावनकुळेंचा मविआ सरकारला इशारा

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारला चांगलेच फैलावर धरले आहे. ‘सरकारमध्ये काही लोक झारीतील शुक्राचार्य आहेत. ते ओबीसी आरक्षणाला विरोध करत आहेत,’ असा धक्कादायक आरोप काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनीच केला आहे. त्यामुळे काँग्रेसला ओबीसींची एवढीच कळकळ असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

बावनकुळे म्हणाले, ‘राज्य मागासवर्गीय आयोगाने राज्यात ओबीसींची जातीनुसार जनगणना करण्याच्या हालचाली सुरु केलेल्या आहे. सरकारने इंपेरिकल डाटा गोळा करावा. पण ओबीसी समाजाचा फुटबॅाल करु नये. डिसेंबरपर्यंत इंपेरिकल डाटा गोळाकरुन ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून द्यावे.’ यासोबतच, ‘जर असे झाले नाही तर राज्यभर ओबीसी जनता रस्त्यावर उतरले, पण 2022 च्या निवडणुका ओबीसींच्या राजकीय आरक्षणा शिवाय होऊ देणार नाही,’ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, असे वंजारी यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेस जर ओबीसींच्या बाजूने आहे तर ओबीसी विरोधी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत कशी आहे?, असा सवाल देखील बावनकुळे यांनी उपस्थित करत महाविकास आघाडीसह काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!