औरंगाबाद : मराठवाड्यात गुलाब चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे गंगापूर,खुल्ताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव, पैठण, सिल्लोड सह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या खरिपाची पिके पाण्याखाली वाहून गेली असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील खरिप शेतीचे नुकसान झाले आहे. अशी मागणी मा. प्रशांत बंब यांनी केली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उदीड, कापूस, अद्रक, टोमॅटो ही पीके उद्धवस्त झाली आहेत. गंगापूर, वैजापूर, कन्नड तालुक्यातील शिवना नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके तर पाण्याखाली गेलीच जिल्ह्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापुर आल्याने शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.
महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, आमदार व सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी यांनी पाहणी दौरा करुन नेहमीप्रमाणे फोटोसेशन केले आणि जिल्हाप्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करुन आठ ते दहा दिवसात शासनाच्या वतीने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजून पर्यंत मिळालेली नाही. तोच मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. सरकारने मराठवाड्यात तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा करावी असेही बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भुजबळांना भेटलोही नाही; अंडरवर्ल्ड डॉन धमकीप्रकरणी निकाळजे यांचा दावा
- शेतकरी संकटात, पोकळ आश्वासनांची नव्हे तर तातडीच्या मदतीची गरज; फडणवीसांची कळकळीची विनंती
- शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावीपणे नियोजन करा, राज्यमंत्री सत्तारांचे निर्देश!
- त्रिसदस्यीय प्रभाग रचनेस रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध – रामदास आठवले
- मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर सोडू नका असं केलेलं आवाहन म्हणजे…; भातखळकरांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

