Share

सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास मदत करा नका : नवल किशोर राम

Published On: 

पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजपासून पुढील 21 दिवसांसाठी देशभर ‘लॉकडाऊन’च्या घोषणा केली असून तिचे पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन केलं आहे.

तसेच या लॉकडाऊनच्या च्या काळातही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मात्र तरीही नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी गर्दी केलेली दिसून येत आहे.

ही परिस्थिती पाहता पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. या घोषणेनंतर आता पुन्हा मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय अडते, चेंबर आणि इतर कामगार संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे भाजीपाला मिळणार की नाही, या भीती पोटी मिळेल त्या किंमतीत ग्राहक भाजीपाला खरेदी करत आहे. “जीवनावश्यक वस्तूंची कुठलीही कमतरता निर्माण होणार. औषधे, भाजीपाल, पशूखाद्य, दूध हे सर्व सुरळीत सुरु राहील. आपल्याकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे, आणि यापुढेही ते सुरू राहतील.” असेही त्यांनी पुन्हा सांगितले.

दरम्यान, राज्यात आधीपासूनच संचारबंदी लागू आहे. संचारबंदीच्या काळातही नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम ठेवण्याबाबत सरकारने खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी संचारबंदीचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं, घराबाहेर पडून ‘कोरोना’च्या संसर्गाला बळी पडू नये, हा संसर्ग आपल्या घरच्यांपर्यंत नेऊ नये. तसेच, नागरिकांच्या सोयीसाठी दवाखाने, हॉस्पिटल, वैद्यकीय  सेवा आणि अत्यंत निकडीच्या वेळी  वाहतूकसेवाही उपलब्ध केली जाईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!