🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेत्या भावना गवळी यांनी ६९ कोटींचा घोटाळा केला आहे. ईडीने दाखल केलेल्या चार्जशिटमध्ये दोघांची नावे आहेत, एक शहीद खान ज्याला अटक झालेली आहे, आणि दुसरं म्हणजे भावना गवळी यांच्या आई ज्यांचे या घोटाळ्यात नाव आले आहे. माझी भावना गवळींना विनंती आहे की तुमच्या घोटाळ्यांची शिक्षा तुमच्या आईला देऊ नका. ईडी समक्ष हजर व्हा, असे आवाहन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळींना केले आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. दोन वर्षातील, महाविकास आघाडी सरकारमधील विविध नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा भांडा फोड केला आहे.
यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, याआधी ईडीने भावना गवळी यांच्या घोटाळ्यासंदर्भात जी चार्जसिट दाखल केली त्यात दोघांचे नाव आहे. ६९ कोटींची प्रॉपर्टी या दोघांच्या नावावर आहे. त्यातील एक आरोपी शहीद खानला यापूर्वीच अटक झाली आहे. भावना गवळी यांच्या आईचे नाव यात आहे. माझी भावना गवळींना विनंती आहे, तुम्ही केलेल्या घोटाळ्यांची शिक्षा तुमच्या आईला देऊ नका ईडीसमक्ष हजर व्हा, असे आवाहन यावेळी भावना गवळींना किरीट सोमय्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?- संजय राऊत
- ‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
