Share

अफवांवर विश्वास ठेऊ नका ! कोरोनाच्या संसर्गाबाबत तज्ञ काय म्हणतात ते वाचा

Published On: 

स्पे. रिपोर्ट : जगात आणि देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक देशांनी प्रतिबंधक उपाय म्हणून लॉकडाऊन केले आहे. त्याचप्रमाणे सामन्य नागरिकही कोरोनापासून स्वतःला वाचवण्यासाठी अनेक उपाय करत आहेत. मात्र काही वेळा चुकीचे उपाय देखील केले जात आहेत. तर विशेषकरून अफवांवर विश्वास ठेऊन नागरिक गरज नसलेल्या औषधांचेही सेवन करत आहेत. त्यामुळे इतर त्रास हिण्याची शक्यता असते.अशातच काही तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना अशा अफवांंपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. तर कोरोनाच्या बाबतीतल्या अनेक शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेक नागरिकांनी चलनी नोटांची देवाण घेवाण करताना कोरोनाचा संसर्ग होतो का ? असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर तज्ञांनी उत्तर दिले आहे. चलनी नोटांच्या देवाणघेवाणीत एकमेकांच्या हाताचा स्पर्श होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे संसर्गही होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी सतत स्वच्छ हात धुतले पाहिजेत. तसेच तोंडावर, नाकावर हात फिरवणे शक्यतो टाळले पाहिजे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात नागरिकांच्या मनात मांसाहार करण्याबाबत संभ्रम आहे. त्याबाबतही तज्ञांनी माहिती दिली आहे. कोरोना असला तरी मांसाहार घेण्यास काहीच अडचण नाही. फक्त आणलेलं मांस नीट स्वच्छकरून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मांस – मटण खाण्याने संसर्ग होणार नाही. तसेच बाजारातून आणलेल्या भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात.

उन्हात गेल्यावर कोरोना मरतो का ? असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जातो. त्यावर तज्ञ म्हणतात की, उन्हात किंवा अतिशीत वातावरणातही कोरोना जिवंत राहू शकतो. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील माहिती दिली आहे.

मोबाईलच्या स्क्रीनवरून कोरोनाचा संसर्ग होतो का ? मोबाईलच्या स्क्रीनवरून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे तज्ञांनी म्हंटले आहे. मोबाईल स्क्रीनवर आपण सर्वाधिक वेळा स्पर्श करतो. हाच मोबाईल जर दुसऱ्या कोणी हाताळला त्यानंतर to तुम्ही परत हाताळला तर त्यातून संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मोबाईल पुसून घेणे आवश्यक आहे.

कोरोनावर मात मिळवण्यासाठी स्वच्छता राखणे हा एकमेव रामबाण इलाज आहे. तसेच कोरोना हा स्पर्शातून पसरणारा विषाणू आहे. त्यासाठी स्वतःला शक्य तेवढ इतरांपासून लांब ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!