बीड : बीडकरांसाठी आनंदाची बातमी आहे.कोरोणाचा एक रुग्ण आढळून आला होता मात्र त्याचीही तिसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता बीड जिल्हा हा कोरोनामुक्त झाला आहे. तसेच बीड जिल्ह्याचे स्थानिक प्रशासन कोरोनाचा सामना करण्यासाठी अजून सक्षम झाले आहे. परळी रेल्वे स्टेशन जवळ एका रेल्वेच्या डब्यात विलगीकरण कोच बनवण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात कोरोणाचा एक रुग्ण आढळून आला होता मात्र त्याचेही तिसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आता बीड जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. प्रशासनाकडून प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेतली जाते आहे.
याचाच एक भाग म्हणून परळी रेल्वे स्टेशनमध्ये आता एका रेल्वेला विलगीकरण कोच बनवण्यात आला आहे. यासाठी परळी रेल्वे स्थानकांमध्ये एका डब्यामध्ये किमान चाळीस रुग्ण राहू शकतील अशी व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे. यासाठी लागणारा बेड असेल टॉयलेट्स असतील याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दरम्यान राज्यात गुरुवारी कोरोनाच्या 583 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 10,498 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णाच्या आकड्याने सात हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, राज्यात काल 27 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

