पुणे : देशात आणि राज्यात आजपासून तिसरा लॉकडाऊन कालावधी सुरु झाला आहे. मात्र राज्य सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात काही ठिकाणी शिथिलता दिली आहे. तसेच रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तिन्ही झोनमध्ये दारू विकण्यास परवानगी देली आहे.मात्र संभ्रमामुळे आज पुण्यातील दारूची दुकानं बंद होती. त्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढत दारू विक्रीस परवानगी दिली आहे.
दारू विक्रीवरील निर्बंध हटवल्यामुळे तळीरामांनी आज अनेक शहरांमध्ये गर्दी केली होती. त्याचप्रमाणे पुण्यातील तळीरामही दारूच्या दुकानांभोवती घिरट्या घालताना दिसत होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत पत्रक न काढल्याने दारूची दुकानं उघडावी की नाही याबाबत विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
आता हा संभ्रम दूर झाला असून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकृत आदेश काढत दारू विकण्यास मुभा असल्याचं म्हंटल आहे. पुण्यात दारू विक्रीला अखेर परवानगी देण्यात आली आहे. याबद्दल पुण्यातील कंटेटमेंट झोन वगळून मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. वाईन शॉप्स, बीअर शॉपी चालू होणार आहे. पण सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. परंतु, शहरात रेस्टॉरंट, बार माञ बंदच राहणार आहे, असा आदेश जिल्ह्याधिऱ्यांनी काढला आहे.
दरम्यान देशभरातील अनेक दारुची दुकानं उघडली असून तळीरामांनी अगदी प्रथम कर्तव्य मानत दारू खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्या असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये तर तळीरामांनी दारू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. तर यामध्ये सोशल डीस्टंंसिंगच्या नियमाचे उल्लंघन केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

