मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे अनेक खेळाडू मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत.
आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर या स्पर्धेतील कमावलेली रक्कम ही कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी द्यावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात वकील वंदना शाह यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत १००० कोटींच्या भरपाईची मागणी केली असुन या रकमेचा वापर कोरोनाच्या रुग्णांसाठी करण्यात यावा. तसेच आयपीएल स्पर्धेचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये येतो का? असा सवाल त्यानी केला आहे.
वंदना शाह यांनी याचिकेत ‘आयपीएल बोर्डाने कमावलेल्या नफ्यातून रुग्णालयांना देणगी द्यावी’ अशी मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धा सुरु असताना अनेक स्तरातुन या स्पर्धेवर टिका होत होती. मंगळवारी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय होण्याअगोदर सकाळी दिल्ली हायकोर्टात स्पर्धा रद्द करण्याची याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र याचिकेवर सुनावणी होण्याआधी स्पर्धा रद्द करण्याची घोषणा केली.
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजासाठी हा दुर्दैवी दिवस : खासदार संभाजीराजे
- केज येथील बाजाराला आळा; पोलीस तहसीलदार सकाळीच उतरले रस्त्यावर
- मोठी बातमी : मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द
- ‘हरल्या म्हणून काय झाले, ममतादीदींना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार आहे’
- कोरोना अलर्ट! बीडचा आकडा पुन्हा दीड हजारांवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

