Share

#Corona_Update : पुण्यात आणखी 7 जण कोरोनाबाधित, तर 4 जण कोरोनामुक्त

Published On: 

पुणे : पुण्यातील डॉक्टरसह संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. तर दुसरीकडे नायडू रुग्णालयातील 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ससून रूग्णालयाच्या डॉक्टरसह संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. एकाच कुटुंबातील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तसंच एका पोलीस कर्मचाऱ्यासह पीएमसीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात काल दिवसभरात 59 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर करोनाबाधित चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 65 वर्षांची महिला, 30 वर्षाचा तरुण आणि 44 वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. मृत व्यक्तींना विविध आजार होते, अशी माहिती आहे.

दरम्यान पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेले 4जण  हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना हा काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोना बरा होत आहे. त्यामुळे घाबरायचे कोणतेच कारण नाही. थोडीशी खबरदारी घेतली तर नक्कीच कोरोनावर मात करू असे, प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

नाही तर लॉक डाऊन तोडून ठाण्यात दाखल होणार : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!