Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री निधीसाठी साडे सतरा लाखांची रक्कम

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १७ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे . मा कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी केलेल्या आवाहनाला सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन देऊन प्रतिसाद दिला आहे .

‘कोरोना’ (कोव्हीड-१९) नंतरच्या उपाय योजनेसाठी एक दिवसाचे वेतन मदतीच्या स्वरुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले. मा कुलगुरू डॉ प्रमोद येवले व कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे शुक्रवारी (दि. १७) धनादेश सुपूर्द केले .

यामध्ये मा कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव यांच्यासह सर्व संवैधानिक अधिकारी तसेच ६७० शिक्षक , अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन मिळून १६ लाख ८० हजारांचा धनादेश देण्यात आला. तसेच राजर्षी शाहू महाराज रोजदांरी कर्मचारी संघटना व आयएसएफ सर्विसेस यांच्याकडून विद्यापीठामार्फत ७५ हजारांची रक्कम जमा करण्यात आली .

दरम्यान, आपला देश आणि राज्य सध्या कोव्हीड-१९ कोरोना व्हायरसच्या अत्यंत गंभीर अशा संकटातून जात आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन कोरोना व्हायरसचा (कोव्हीड-१९) प्रकोप रोखण्याकरिता प्रयत्नशील आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांनी मुख्यमंत्री निधीसाठी निधी द्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा ना उदय सामंत यांनीही केलेले आहे . प्रत्येक नागरिकाने आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे. या भावनेतून संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ . प्रमोद येवले यांनी केले आहे .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!