मुंबई : चित्रपटातील काही डायलॉग इतके लोकप्रिय असतात की, त्या डायलॉगवर बरेच व्हिडिओ बनविले जातात. उदाहरण म्हणून सांगायच झाल्यास अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘शेरशाह’चित्रपटातील एक डायलॉग खूप लोकप्रिय झाला आहे. एका छोटया मुलीने त्यावर परफॉर्म केला असून सिद्धार्थ मल्होत्राने स्वतः शेअर केले आहे.
दरम्यान’शेरशाह’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. या चित्रपटात त्याने शहीद कॅप्टन विक्रम बत्रा तर कियारा आडवाणीने विक्रम यांची प्रेयसी डिंपलची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील डायलॉगही खूप लोकप्रिय झाले आहेत. दरम्यान एक छोटी कियारा या चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसली. सिद्धार्थने आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये डिंपल चीमाचे डायलॉग बोलत ती विक्रम बत्रा म्हणजेत सिद्धार्थला विचारत आहे की, ‘तुला आर्मी जॉईन करायची आहे?’ या छोट्या कियाराची डायलॉग बोलण्याची स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सिद्धार्थने लिहिले की, ‘डिंपलच्या रूपात छोट्या कियाराला भेटा.’
https://www.instagram.com/reel/CU7uYekgKVa/?utm_medium=copy_link
अभिनेत्री कियारा आणि सिद्धार्थ खऱ्या आयुष्यात डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. प्रेक्षक ही जोडी पुन्हा पडद्यावर यावीसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतचं व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर कियाराने देखील यावर हार्ट इमोजी पोस्ट केला आहे, तर करण जोहरने’उफ ये दिल मांगे मोर’कमेंट केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खेळाडूंसाठी ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय; शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिय


