🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ग्रामीण भागात 50 वर्षांपासून खांबावर जुन्याच वीज वाहिन्या आहेत. त्या धोकादायक असल्याने नवीन वाहिन्या टाकून शेतकऱ्यांना दिवसाच सुरळीत वीजपुरवठा द्यावा, अशा सूचना करून विविध मागण्याही आमदार नमिता मुंदडांनी बैठकीत केल्या.
आमदार मुंदडा यांनी विविध समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयात जाऊन बैठका सुरू केल्या आहेत. त्यानुसार महावितरण उपविभागातील अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. बैठकीत आमदार मुंदडांनी प्रामुख्याने रोहित्र बदलाचा मुद्दा मांडला. रोहित्र जळाल्यास शेतकऱ्यांना स्वखर्चाने ते महावितरण कार्यालयात आणून बदलून न्यावे लागतात. वाहने भाड्याने लावा; पण शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड टाकू नका, पूर्वीप्रमाणे महावितरणनेच रोहित्राची वाहतूक करावी, अशी मागणी मुंदडांनी केली होती.
त्यासाठी वर्षभरापूर्वी त्यांनी उपोषणही केले होते; मात्र यापुढे ही सर्व जबाबदारी महावितरण घेणार असून याची अंमलबजवणी तत्काळ सुरू करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता खुरेशी यांनी सांगितले. नवीन रोहित्रांना तत्काळ मंजुरी देऊन काम सुरू करावे, नवीन वस्त्यांना सौभाग्य योजनेचा लाभ देण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, लाइनमन यांच्याकडून सर्वेक्षण करून घ्यावे, दोन वर्षांपासून बंद असलेली कोटेशनची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी.
सोमनाथ बोरगाव, डिघोळअंबा येथील सबस्टेशनच्या रखडलेल्या प्रस्तावावर कार्यवाही पुन्हा सुरू करावी, वाघाळा येथे 132 केव्ही केंद्रासाठी पाठपुरावा करून मंजूर करून घ्यावे, धानोरा उपकेंद्रातून देवळ्यासाठी नवीन फिडर काढण्यात यावे, पाटोदा-देवळा परिसरात नवीन 33 केव्ही केंद्र उभारण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीस सुरवात करावी, प्रत्येक उपकेंद्रासाठी एका अभियंत्याची नेमणूक करावी, अंबाजोगाई शहरासाठी उपअभियंत्याचे स्वतंत्र कार्यालय सुरू करावे, अभियंता, लाइनमन यांच्या रिक्त जागा भराव्यात, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार मुंदडांनी केल्या.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1205795696479105024?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205793891808473089?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
