Share

महाराष्ट्र केसरी : सोलापूर जिल्ह्याकडून ज्ञानेश्वर जमदाडे व अक्षय मंगवडे करणार प्रतिनिधित्व

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर जिल्हा महाराष्ट्र केसरी व कुमार केसरी निवड कुस्ती स्पर्धा दि.१४-१५ डिसेंबर चिकमहुद,ता.सांगोला येथे घेण्यात आली या कुस्ती स्पर्धेत माती विभागातून ज्ञानेश्वर(माऊली)जमदाडे, मॅट(गादी) विभागातून अक्षय मंगवडे यांची अंतिम निवड झाली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून मल्लांनी हजेरी लावत सर्वप्रथम १० विविध वजनी गटातून नोंदणी घेण्यात आली.

माती विभाग, गादी विभाग, कुमार केसरी गटानुसार ५७कि. ते १२०कि सहभागी मल्लांची विभागणी करून यांची लढत करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे प.महाराष्ट्र सचिव भरत मेकाले यांच्या उपस्थितीत परिषदेच्या मान्यता प्राप्त पंचाच्या देखरेखीखाली या स्पर्धेतील सर्व लढतीचे काटेकोरपणे खेळवले गेले. उत्तम व तंत्रशुद्ध डावपेच तसेच गुणांच्या नुसार या सर्व लढतीतील निकाल पंचाच्या वतीने देण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील कुस्तीगीर परंपरेचा उत्कृष्टपणे दाखला देत, कोणत्याही मल्लाची तक्रार असल्यास नियमावलीचे पालन करत आक्षेप घेतले असता त्याची तात्काळ निरसन करण्यात आल्याने मल्ल व वस्ताद यांनी समाधान व्यक्त केल्याचे दिसत होते.

स्पर्धेचे उदघाटन सांगोला तालुक्याचे नूतन आमदार ऍड. शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते पार पडले सोबत चिकमहुद सरपंच रवींद्र बापू कदम, उपसरपंच सुरेश कदम, पै.दादासाहेब जाधव,पै.प्रमोद हुबाले गावातील सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते पार पडले. तर स्पर्धेचा बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मा.डॉ.धवलसिंह मोहिते पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील ,उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, शिवछत्रपती पुरस्कार उमेश सुळ, नामदेव बडरे,महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, सो.तालीम संघ उपाध्यक्ष सर्जेराव चवरे, विलास कंडरे यांच्या हस्ते पार पडले.

सोलापूर जिल्ह्यातील प्रतिनिधी मल्लांने महाराष्ट्र केसरी मानाची गदा आणण्यात यशस्वी झाल्यास श्रीकृष्ण आखाडा तालीम केंद्राचे भरत मेकाले यांच्या कडून एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा विजेत्यांची, वजनी गट व विभागानुसार नावे सोबत लेटरपॅड सह जोडली आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1207944623018016768?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1207944309808353280?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!