Share

दिवाकर रावते आज साधणार शेतकऱ्यांशी संवाद

Published On: 

औरंगाबाद: शिवसेना नेते दिवाकर रावते मंगळवारी (ता. 19) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी मदत केंद्रांना भेटी देणार आहेत.

तसेच परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दौऱ्यात त्यांच्यासोबत आमदार उदयसिंह राजपूत, रमेश बोरणारे, अब्दुल सत्तार, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांचीही उपस्थिती राहील.

या दौऱ्यात शिवसेना नेते श्री. रावते गंगापूर तालुक्यातील अमळनेर, लासूर स्टेशन, लासूरगाव, वैजापूर तालुक्यातील गारज, कन्नड तालुक्यातील औराळा, हतनूर, खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर व सिल्लोड येथे मदत केंद्रांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. उपस्थितीचे आवाहन उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे, कृष्णा पाटील डोणगावकर, बाबासाहेब जगताप, रघुनाथ चव्हाण, दिनेश मुथा, सुभाष कानडे, केतन काजे, राजू वरकड, किशोर अग्रवाल, डॉ. अण्णा शिंदे, गणेश अधाने यांनी केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!