🕒 1 min read
मुंबई : राज्य सरकारने आज अर्थससंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने विविध योजनाना मंजुरी दिली आहे. त्याच बरोबर विविध महामार्गाच्या कामाला मंजुरी दिली आहेत. मुंबई दक्षिणला उपनगराशी पूर्व द्रुतगती महामार्गास विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव दिल्याने सर्व स्तरावरून स्वागत होत आहे. असे आशयाचे ट्विट करत अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
#अर्थसंकल्प2021 भाषणात आज पूर्व द्रुतगती मार्गास आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे नाव देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, अजित पवारजी, बाळासाहेब थोरातजी, एकनाथ शिंदेजी नाना पटोलेजी, आदित्य ठाकरे, संजय बनसोडे यांचे आभार
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) March 8, 2021
राज्यातील अर्थसंकल्पला सर्व स्तरावरून स्वागत होत आहे. दुपार पासून या अर्थसंकल्पाला सुरुवात झाली होती. या अर्थसंकल्पात महामार्गाला विलासरावांचे नाव दिल्याने महाविकास आघाडीला विलासरावांची आठवण राहिली असे बोलले जात आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे. विलासराव देशमुख यांचे नाव द्रुतगती महामार्गास दिल्यामुळे याचे पुत्र अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांचे आभार मानले.
मुंबई दक्षिणला उपनगराशी पूर्व मुक्त मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे. यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला देण्यात आले आहे. या मार्गाचे काम ४४ टक्के पूर्ण झाले आहे. येणाऱ्या काही महिन्यात हा मार्ग सामन्यांसाठी खुला होईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ’, दरेकरांची अर्थसंकल्पावरून टीका
- अर्थसंकल्पातून नाराज बंजारा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न?
- पोहरादेवीच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी देणार-अजित पवार
- उस्मानाबाद मेडिकल कॉलेज; घोषणा केली भाजपने, पूर्ण केली राष्ट्रवादीने!
- मोठी बातमी! महिलांच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत, अजित पवारांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

