औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी राज्याचे महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि माजी आ. तथा बँकेचे माजी चेअरमन नितीन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सहकार विभागातर्फे निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. आज महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजीआमदार नितीन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वर्चस्व राहीलेल्या या बँकेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांच्या रुपाने शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. या बँकेच्या संचालक मंडळावर एकूण २१ जागा असून त्या जागांसाठी मतदान होणार आहे. २१ मार्च रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेनंतर २२ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं ‘शिवसंपर्क अभियान’ चालू शकतं तर मग शिवभक्तांच्या शिवजयंतीवरच निर्बंध का ?
- ‘काँग्रेसचा खोटारडेपणा असाच सुरु राहिला तर काँग्रेस इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही’
- संजय राठोडांनी राजीनामा दिला ही माहिती चुकीची; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
- भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
- आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं ठरण्याआधीच भाजप-रिपाइंचं ठरलं ?

