Share

या महिन्यात तब्बल ६ कोटी ३७ हजार ५९६ लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप – छगन भुजबळ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून 1 जुलै ते 27 जुलैपर्यंत 6 कोटी 37 हजार 596 लाभार्थ्यांना 41 लाख 76 हजार 450 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब, तसेच APL शेतकरी लाभार्थी अशा रेशनकार्डमधील 7 कोटी 49 लाख नागरिकांपैकी 6 कोटी 37 हजार 596 लाभार्थ्यांना 18 लाख 73 हजार 379 क्विंटल गहू, 14 लाख 43 हजार 128 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो अन्न-धान्य (गहू व तांदूळ) मोफत देण्याच्या योजनेमधून दि. 15 जुलै पासून जुलै महिन्यासाठी आतापर्यंत 8 लाख 59 हजार 944 क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले.

स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 3 लाख 30 हजार 49 शिधापत्रिका धारकांमार्फत ते जेथे राहत आहे त्याठिकाणी पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत अन्नधान्याची उचल केली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येते. या योजनमधून दि. 6 जून पासून जून महिन्यासाठी आतापर्यंत 31 लाख 87 हजार 601 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

उद्या निकाल : ‘या’ वेबसाईट्स वर ‘असा’ पहा १० वीचा निकाल

कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 76 एपीएल केसरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे आतापर्यंत 13 लाख 4 हजार 46 क्विंटल वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड 1 किलो तूर किंवा चणा डाळ मोफत देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे 3 लाख 83 हजार 121 क्विंटल डाळीचे वाटप केले आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ दिला जातो. आतापर्यंत या योजनेतून 1 लाख 33 हजार 709 क्विंटल तांदूळ वितरित केला आहे.

आनंदाची बातमी : राज्याने गाठली एका दिवसातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च रेकॉर्डब्रेक संख्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!