सोलापूर : एकत्र खेळू नका कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी सूचना करून समुपदेशन करणाऱ्या परिचारिकेची व तिच्या पतीची दुचाकी जाळण्याचा प्रकार कुंभारी येथील गोदूताई परुळेकर विडी कामगार वसाहत येथे घडली.
मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील परिचारिका सुरेखा श्रीशैल पुजारी या गुरुवारी पती श्रीशैल पुजारी यांच्याबरोबर रुग्णालयाला कर्तव्यावर जात होत्या. गोदूताई घरकुलच्या मोकळ्या मैदानावर काही मुले खेळत होते. त्यांना पुजारी दाम्पत्याने, कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, आता तरी तुम्ही असे मैदानात एकत्र खेळू नका, अशी सूचना केली.
त्यावर काही तरुणांनी, तू रोज मार्कंडेय हॉस्पिटलला जातेस तुझ्यामुळे कोरोना येत नाही का ? असं म्हणत, दमदाटी केली. यामुळे पुजारी दाम्पत्याने कुंभारी पोलिस चौकीमध्ये तक्रार केली, मात्र कोणीही पोलीस आले नाहीत.
दरम्यान, शुक्रवारी पहाटे 2 वाजता अज्ञात समाजकंटकांनी शुक्रवारी पहाटे 2 वाजता सुरेखा पुजारी यांची दुचाकी आणि त्यांच्या पतीची दुचाकी या दोन्ही गाड्या पेट्रोल टाकून जाळल्या. याबाबत फिर्याद देण्यास पुजारी दाम्पत्य वळसंग पोलीस ठाण्यात गेले असता दंड संहिता 1860 प्रमाणे कलम 435,34,188 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 51(बी) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली आहे. तर आता परिचारिकेची दुचाकी जळणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
…अस झालं तर उद्धव ठाकरेंना द्यावा लागणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा | Can CM Gives His Resign ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

