Share

पुन्हा चर्चा शरद पवारांच्या ‘त्या’ भाषणाची; सुप्रिया सुळेंनी दिला आठवणींना उजाळा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०१९ची महाराष्ट्रातील निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. मात्र या ऐतिहासिक घडामोडीची खरी सुरवात झाली होती ती १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यामधून. राष्ट्रवादीला एकामागून एक नेते रामराम ठोकत होते. भाजपने तर समोर लढायला ‘पैलवान’ नाहीच अशा अविर्भावात लढायला सुरवात केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी शरद पवारांची ती भर पावसातील ऐतिहासिक सभा साताऱ्यात झाली. या सभेने फक्त साताऱ्याचेच तर राज्याचे राजकारण बदलले होते. 80 वर्षांचे शरद पवार भर पावसात भाजपवर तुटून पडले होते. आणि राज्यातील युवा पिढी त्यांना भरघोस पाठिंबा देत होती. जसा पाऊस बरसत होता तसेच पवारही भाजपवर बरसत होते. शरद पवार यांच्या सभेला दोन वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त सुप्रिया सुळे यांनी पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

https://www.facebook.com/supriyasule/posts/4707429022622391

१८ ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यात शरद पवारांनी जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा आयोजित केली होती. याबाबत फेसबुक पोस्त करत  सुप्रिया सुळे यांनी लिहिले की, हाच तो क्षण, हिच ती वेळ…आज बरोबर दोन वर्षे झाली,जेंव्हा पुन्हा एकदा सिद्ध झाले की, ‘महाराष्ट्राचा स्वाभिमानी यशवंत विचार कधीही दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही आणि यापुढेही झुकणार नाही.’ या सभेदरम्यान मुसळधार पावसात शरद पवारांनी भाषण थांबवले नाही. पावसात भिजत पवारांनी भाषण करत विरोधकांनावर जोरदार टीका केली होती.

दरम्यान, या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सभेबद्दल उत्सुकता होती. पाटणमधील सभा उरकून पवारांनी साताऱ्यातील सभेच्या मैदानावर पाऊल ठेवताच पाऊस सुरू झाला; पण लोक जागचे हलले नाहीत. पवार बोलायला उभे राहिले आणि पावसाचा जोर वाढला. लोक समोर भिजत असल्याने पवारांनी डोक्यावरची छत्री बाजूला केली आणि धो-धो पावसाबरोबरच धीरगंभीर आवाजात शरद पवारही बरसू लागले. ‘गतवेळी माझी चूक झाली, ती दुरुस्त करण्याचे काम सातारकरांनी करावे’, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आणि साताराच नव्हे तर, संपूर्ण राज्याचे राजकारण या सभेने बदलून टाकले. पवारांच्या या सभेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. आजही त्या सभेची चर्चा होत असते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!