बेलकुंड : सहकार क्षेत्रात विशेषतः साखर उद्योगात जिल्ह्यात जाळे निर्माण करण्याचे काम मांजरा परिवाराने केले आहे; मात्र निवडणुकीपुरते कारखाने सुरू करायचे आणि नंतर कुलूप लावायचे असे आम्ही कधी केले नाही. राजकारण बाजूला सारून आम्ही संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्यास मदत केली आहे. आता हा कारखाना मांजरा परिवारात आला असून कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊ, असा विश्वास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला.
कारखान्याला भेट दिली, यावेळी ते बोलत होते. देशमुख म्हणाले, की सध्याच्या परिस्थितीत कारखाना सुरू करणे कठीण नाही; पण तो चालवणे अवघड आहे. मारुती महाराज कारखान्यासाठी संचालक मंडळाने योजना तयार करावी आणि तातडीने त्यावर पावले उचलावीत.
यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे, उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, माजी आमदार त्र्यंबक भिसे, एस. आर. देशमुख, आबासाहेब पाटील, सर्जेराव मोरे, गणपत बाजुळगे, श्याम भोसले, श्रीशैल्य उटगे, उमेश जोशी, चॉंदपाशा इनामदार, अभय साळुंके, प्रदीप चव्हाण, अमित माने, प्रवीण कोपरकर, राजेंद्र मोरे व शेतकरी सभासद उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
