🕒 1 min read
कानपूर : वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध व्यासपीठांवरुन बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर केंद्र सरकारच्या नागरिकत्व संशोधन कायदा आणि एनपीआर, एनआरसी विरोधात वक्तव्य करीत असून याचमुळे स्वरा भास्करच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कानपूरमधील सीएमएम-७ कोर्टात स्वरा भास्कर हिच्या विरोधात कानपूरचे वरिष्ठ अधिवक्ता विजय बक्शी यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.आयपीसी कलम 124 ए, 153 ए, 153 बी आणि 505 (2) अंतर्गत स्वरा हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विजय बक्शी यांनी सांगितले, आपल्या चिथावणीखोर भाषणांमुळे स्वरा भास्कर भारत सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भडकावू भाषण करत आहे. या कारणांमुळे दोन समाजात वाद उद्भवत आहे. या संदर्भात मी देखील स्वरा भास्करचा एक व्हिडीओ पाहिला होता, ज्यामुळे दिल्लीत दंगलीची परिस्थिती उद्भवली. हेड कॉन्स्टेबल रतन लाल आणि आईबीचे अंकित शर्मा यांची या दंगलीत हत्या करण्यात आली होती. या सर्व कारणांमुळे मी ही याचिका दाखल केल्याचे बक्शी यांनी सांगितले.दरम्यान,या प्रकरणातील माझे म्हणणे ऐकून घेण्यासाठी न्यायालयाने 20 मार्च ही तारीख दिल्याचे बक्शी यांनी सांगितले.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

