🕒 1 min read
मुंबई : दसऱ्यानंतर काही दिवसांनी ठाण्यात पार पडलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेमध्ये काही नेतेमंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या केलेल्या नकला चर्चेचा विषय ठरल्या होत्या. यासंदर्भात ठाकरे गटातील काही नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यासोबत अजून काही नेत्यांवर याबाबतीत भाजपकडून आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचे आरोप फेटाळत चांगलाच टोला लगावला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपावर टीका करत एक व्हिडिओ ट्विट केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ शेअर करत भाजपाला लक्ष्य केलं आहे. ‘भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाचे नीट अध्ययन केले असते तर शिवसेनेच्या भास्कर जाधव व इतर नेत्यांवर नकला केल्या म्हणून गुन्हे दाखल झाले नसते. नकला आणि कलाविष्कार यातील फरक समजण्यासाठी मोदीजींचा कलाविष्कार पाहणे गरजेचे आहे”, असं सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
भाजपाच्या शिर्ष नेतृत्वाचे नीट अध्ययन केले असते तर @ShivSena च्या @_BhaskarJadhav व इतर नेत्यांवर नकला केल्या म्हणून गुन्हे दाखल झाले नसते.
नकला आणि कलाविष्कार यातील फरक समजण्यासाठी मोदीजींचा कलाविष्कार पाहणे गरजेचे आहे. pic.twitter.com/U86MquIgUg— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 14, 2022
या संदर्भात सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे आणि माझ्यासाठी वेगळे नियम का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “राज दादा आमचे चुलत भाऊ. आमचे राज दादा एवढ्या सगळ्या मिमिक्र्या करतात त्या वेळी काय करता? राज भाऊंवर किती केसेस दाखल केल्या तुम्ही विचारलं पाहिजे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
सचिन सावंत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदींच्या भाषणातील दोन व्हिडीओ क्लिप एकत्र केल्या आहेत. या दोन्ही व्हिडीओ क्लिपमध्ये मोदी राहुल गांधींची नक्कल करताना दिसत आहेत. पहिल्या क्लिपमध्ये मोदींनी राहुल गांधींची हाताच्या बाह्या वर सरकवण्याची नक्कल केली आहे. तर दुसऱ्या क्लिपमध्ये संसदेत भाषणादरम्यान राहुल गांधींची डोळा मारण्याची नक्कल मोदी करताना दिसत आहेत. काँग्रेसकडून ट्विट केलेल्या या व्हिडिओची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा आहे. यावर भाजप काय उत्तर देतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Diwali 2022 | ‘या’ टीप्सच्या मदतीने दिवाळीची सजावट बनवा अधिक आकर्षक
- Shashikant Ghorpade | दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा नदीपात्रात सापडला मृतदेह
- PM Kisan Yojana : शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! ‘या’ तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता
- Andheri By Election | अंधेरी पोटनिवडणूक ऋतुजा लटके एकतर्फी जिंकतील ; राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची प्रतिक्रिया
- Eknath Khadse | “रश्मी शुक्ला जेव्हा फडणवीसांना भेटल्या तेव्हाच त्यांना…”, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
