धुळे प्रतिनिधी – चीनमधल्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या जीवघेण्या करोना आजराचा प्रादुर्भाव भारतात आणि खास करून महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसून आला. राज्यातला पहिला रुग्ण पुण्यात सापडला आणि राज्य प्रशासन कामाला लागले. परिणामी पुणे परिसरात तर काळजी घ्यायला सुरवात झालीच पण राज्यातील इतर जिल्हा प्रशासनालाही राज्य शासनाने आदेश दिले.
धुळे जिल्ह्याच्या विचार करता जिल्ह्यातील चारही तालुक्यातील तहसीलदार हे जिल्हाधिकारी डी. गंगाधरन यांच्या वेळोवेळी संपर्कात आहेत.
जिल्ह्यातील सगळ्याच ग्रामपंचायतींना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की वेळोवेळी निर्जंतकीकरण करणाऱ्या औषधाची फवारणी करावी.
तालुका आरोग्य केंद्रातील यंत्रणा सक्षम करण्यात आल्या आहेत. धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘ कोरोना कक्ष ‘ उभारण्यात आला आहे.
आरोग्य यंत्रणेचा प्रश्न तसा गंभीरच आहे कारण धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्याचा विचार करता फक्त ८० व्हेंटिलटर ची क्षमता असलेले वार्ड उपलब्ध आहेत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यास काय होईल याचा अंदाज न केलेलाच बरा. जिल्हा पोलिस प्रशासन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांचा मार्गदर्शनाखाली चांगलेच कामाला लागले आहे. शहरी भागात तर सोडाच पण अगदीच आदिवासी खेडी – पाडी सगळ्याच ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू आहे.
अजून तरी जिल्ह्यात एकही रुग्ण नाही पण बऱ्याच लोकांचे रक्ताचे नमुने जिल्हा आरोग्य विभागाने घेतले आहेत आणि पुणे,मुंबई इतर ठिकाणा वरून आलेल्या स्थानिकांना ससक्तीने घरात होम क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा,पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन कोरोना नियंत्रणासाठी पूर्णतः कामाला लागली आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

