टीम महाराष्ट्र देशा- जगमित्र साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी करताना सरकारी जमिनीचे बेकायदा हस्तांतर करून घेतल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत . मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शासकीय जमीन अनधिकृतपणे खरेदी केल्याचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात जाऊन पोहचले आहे.
पुस ता.अंबाजोगाई येथे प्रस्तावित जगमित्र शुगर्स या साखर ऊद्योगासाठी धनंजय मुंडे यांनी केलेले तब्बल सत्तर एकरहुन अधिक जमिनींच्या व्यवहारांमध्ये गैरप्रकार व खोटे दस्तऐवज आढळल्याचे पोलिस तपासांत समोर आले असुन तपास अधिकाऱ्यांनी यातील बलखंडी बुवा संस्थानाची इनामी जमीन लुबाडल्याप्रकरणी दिरंगाई केल्याबद्दल पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान,मुंबई हायकोर्टाने या निर्णयावर स्थगिती द्यावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.यावर आता सुप्रीम कोर्ट उद्या (१४ जून) रोजी सुनावणी करणार आहे.
Supreme Court agrees to hear tomorrow a plea of Maharashtra Legislative Council Dhananjay Munde seeking stay on Bombay High Court order directing registration of FIR against him in connection with alleged illegal purchase of government land in Beed district. pic.twitter.com/ft6rikmdly
— ANI (@ANI) June 13, 2019


