🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रनौत नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. कंगना नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडत असते. नुकतंच कंगणाने हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सलमा हायक हिचे एक ट्विट रिट्विट केलं आहे.
हॉलिवूड अभिनेत्री सलमाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर लक्ष्मी देवीचा फोटो शेअर करत म्हणाली, “जेव्हा मला माझ्या अंतर्गत सुंदरतेशी जुळायचं असतं तेव्हा मी मेडिटेशन करताना देवी लक्ष्मीचे ध्यान सुरू करते. हिंदू धर्मात धन, भाग्य, प्रेम, सुंदरता, माया, आनंद आणि समृद्धीची देवी मानली जाते. या देवीच्या फोटोने मला आनंद मिळतो आणि आपल्या आतील सुंदरतेला बघण्यासाठी हा सर्वात चांगला दरवाजा आहे.”
Across the world I unexpectedly find Krishna, Shiva or Devi devotees, reagardless of religion or race many people love Rama or follow Bhagavad Geeta, but in India so many unfortunate souls mock Bhakti, clearly we aren’t the ones who choose devotion rather devotion chooses us ❤️ https://t.co/RvFmqfrMWU
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 12, 2020
तर कंगणा सलमा हायकचं ट्विट रिट्विट करत म्हणाली, “जगाच्या अनेक भागांमध्ये मला अप्रत्यक्षपणे कृष्णा, शिवा आणि देवी भक्त भेटले आहेत. ते कोणत्याही धर्माचे किंवा मूळाचे लोक असो ते भगवान रामावरही प्रेम करतात आणि भगवत गीतेला फॉलो करतात. पण आपल्या देशात काही लोक भक्तीची खिल्ली उडवतात. स्पष्ट आहे की, आपण आस्थेला निवडत नाही तर आस्था आपल्याला निवडते.”
महत्वाच्या बातम्या :-
- IPL २०२०: एबीडी आणि विराट कोहलीचा नवा विक्रम..
- ‘अंगूर’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार रणवीर…
- नगर जिल्ह्याचा गाैरव; पंतप्रधानांनी ट्विट करून आज होत असलेला कार्यक्रम पाहण्याचे केले आवाहन!
- कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावर प्रशासन ठाम!
- एकनाथ खडसेंच्या आदेशाने माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
