Share

अमिताभ गुप्ता यांना क्लिनचीट : हे आघाडी सरकार आहे की वाधवान सरकार आहे ?

Published On: 

मुंबई : टाळेबंदीच्या काळात येस बँक, एचडीआयएल घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कपिल आणि धीरज वाधवान बंधूंना महाबळेश्वरला जाण्यासाठी खास परवानगीचे पत्र दिल्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना सरकारने केवळ ‘समज’ दिली असून ते पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

एप्रिल महिन्यातील लॉकडाऊनच्या काळात आंतरजिल्हा प्रवासावर बंदी होती. पण त्याच दरम्यान वाधवान कुटुंबासह २३ जणांनी खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. त्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी अमिताभ गुप्ता यांचे शिफारस पत्र दाखवले होते.या घटनेची माहिती माध्यमांनी समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

यावरुन विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले होते. अखेर अमिताभ गुप्ता यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासनही दिले होते. अमिताभ गुप्ता यांना चौकशी समितीने निर्दोष ठरवल्यामुळे त्यांना पुन्हा प्रधान सचिव पदावर रुजू करुन घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार -अमित देशमुख

देवेंद्र फडणविसांनी साधला निशाणा

“लॉकडाउनच्या काळात सीबीआय आणि ईडीचा आरोप असलेले वाधवान बंधू यांना फिरण्यास पास दिलेले अधिकारी अमिताभ गुप्ता यांना पुन्हा एकदा त्याच जागी नियुक्त करण्यात आलं आहे. मी त्यावेळीही सांगितलं होतं अशा प्रकारचा कोणाताही पास कोणताही अधिकारी आपल्या भरवशावर देऊ शकत नाही. जोपर्यंत सरकारमधील प्रमुख लोकं आदेश देत नाहीत तोवर असा पास त्यांना देता येत नाही.आता ज्या गतीनं त्यांना क्लिनचीट देण्यात आली आणि त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आलं यातून सरकारमधल्या किंवा सरकार चालवणाऱ्या प्रमुखांच्या इशाऱ्यावरच वाधवान बंधूंना पास देण्यात आला होता हे स्पष्ट होत आहे. तसंच हे आघाडी सरकार आहे की वाधवान सरकार आहे ? या संपूर्ण घटनेची चौकशी सीबीयाच्या माध्यमातून केली पाहिजे अशी मागणीही मी यानिमित्ताने करतो- देवेंद्र फडणवीस (विरोधी पक्षनेते ,विधानसभा )

महाराष्ट्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भूमिपुत्रांनो पुढे या – उद्धव ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!