Share

देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षणाचे श्रेय मिळेल या भीतीपोटी मविआने आरक्षण घालवले, लोणीकरांचा आरोप!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाची माफी मागून पुन्हा आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी भाजप नेते, आमदार बबनराव लोणीकर(Babanrao lonikar) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. आरक्षण प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास रस्त्यावर उतरु, असा इशाराही त्यांनी दिला. देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvees) यांना मराठा आरक्षणाचे श्रेय मिळेल या भीतीपोटी महा विकास आघाडी सरकारने मराठा समाजाचे आरक्षण घालवले असा आरोप लोणीकर यांनी केला आहे.

प्रत्येक वेळी केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, ते त्यांनी थांबवावे. मराठा आरक्षणाबाबतचा कायदा करण्याची टिकवण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची आहे, असेही त्यांनी नमूद केले. मराठा आरक्षणाची मागणी १९८० पासून सातत्याने होत आहे. मागील पस्तीस वर्षाच्या कालखंडात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षणा बाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व बाबींचे पालन करून राज्यघटने मध्ये शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास एसइबीसी या विशिष्ट व्यवस्थे प्रमाणे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले.

उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले पण पुढे राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आली आणि या सरकारच्या गंभीर चुकांमुळे व बेफिकिरीमुळेच मराठा आरक्षण रद्द झाले आहे, असा आरोप लोणीकर केला. केवळ देवेंद्र फडणवीस यांना श्रेय मिळेल यासाठी महा विकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलांची मोठी फौज उभी करणे आवश्यक होते. न्यायमूर्ती गायकवाड समितीने अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेल्या अहवालाची चार हजार पेक्षा अधिक पाने गायब झाली, असा आरोपही त्यांनी करत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी नव्याने पुन्हा एकदा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!