टीम महाराष्ट्र देशा – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्तीचा मंत्रिमंडळाचा निर्णय राजभवनावर मंजुरीच्या प्रतिक्षेत असतानाच आता या प्रकरणात नवीन वळण आले आहे.
आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्यातील प्रलंबित विधानपरिषद निवडणुका तातडीने घेण्याची विनंती केली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, ‘कोरोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारीजी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो.
संविधानाच्या तत्वांचे पालन करीतच मा. राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे.’
‘केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारसीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून तत्काळ विधानपरिषदेच्या ९ जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, हा आम्हाला विश्वास वाटतो. शिवाय, यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, या संकेतांचे सुद्धा पालन होईल. मा. मुख्यमंत्र्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.’
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

