Share

देवेंद्र फडणवीसांनी साधला कृषी क्षेत्रातील विविध प्रतिनिधींसोबत संवाद

Published On: 

मुंबई : कृषी क्षेत्रातील विविध प्रतिनिधींसोबत आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने संवाद साधला. या संवादात केंद्रीय पंचायतीराज, कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री पुरूषोत्तम रूपाला, प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अनिल बोंडे, पाशा पटेल उपस्थित होते.

कापूस, सोयाबीन, कांदा, धान, द्राक्ष, ऊस, दाळिंब, संत्रा, काजू, सीताफळ, चणा, दूध उत्पादकांच्या विविध समस्या, आजच्या स्थितीत पीकविमा, शेतमाल खरेदी, कर्जमाफी इत्यादींची स्थिती याबाबत व्यापक आणि सखोल चर्चा यावेळी झाली.

कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेच्या समस्या असल्याने यंदाचा शेतीचा हंगाम यशस्वी करण्यासाठी काय उपाय करावे लागतील, याबाबत निरनिराळ्या सूचना उपस्थितांनी दिल्या. हा हंगाम यशस्वी झाला, तर त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे. शेतमालाची खरेदी पूर्ण क्षमतेने यशस्वी करणे, याला सरकारचे प्राधान्य असायला हवे. जेएनपीटीच्या माध्यमातून कंटेनर वाहतूक सुरू झालेली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा ‘किसान रथ’सारख्या अभिनव संकल्पनांची माहिती यावेळी दिली.

या संवाद सत्रात पुणे विकास संघाचे चंदन पाटील, डॉ. वार्ष्णेय (पुणे), किसान मोर्चाचे भाई मुंडे, आनंद राऊत (उमरेड), वासुदेव काळे (दौंड), हरिभाऊ जावळे (जळगाव), अजय गव्हाणे (परभणी), डॉ. अमोल कोहळे (वरूड), अरविंद नळकांडे (दर्यापूर), तुषार पवार (कराड, सातारा), अतुल काळसेकर (सिंधुदुर्ग), अजित गोगटे (सिंधुदुर्ग), राध्येश्याम मुंगमोडे (साकोली), दत्तात्रय पानसरे (अहमदनगर), शिवनाथ बोरसे (चांदवड), रमेश कोकाटे, अशोक धोटे (नागपूर), जगन्नाथ खापरे, श्याम गट्टाणी (बुलढाणा), नाना आखरे (नागपूर), विलास दहीभाते (जालना), सुनील सूर्यवंशी (चांदूर) इत्यादी सहभागी झाले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!