मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर यायला लागली असून, आता तीन पक्षातील विसंवाद जाहीरपणे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच आता माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आरोप केले असून, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.
राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. मग जर दोन कॉंग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर मग आम्ही त्यांच्या विचारांचे होणे शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत. आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिकच राहणार आहोत असं म्हणत त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.
महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. सरकार आघाडीचे आहे शिवसेनेचे नाही. शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे, हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपले सरकार आहे. आपले कशासाठी म्हणायचे तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेचे नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपले गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असे गीते म्हणाले. शिवसेना काँग्रेस एकविचाराची होऊ शकणार नाही असे अनंत गीते यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गीते यांच्या या फटकेबाजीमुळे भाजप नेत्यांचा आनंद गगनात मावेना असं झालं आहे. गीते यांच्या या विधानाला आधी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हवा दिली. शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा. त्यातून एकच आवाज बाहेर येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे हे पोलिटिकल सुसाईड आहे, ही युती नकोच, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गीतेंनी केलेलं वक्तव्य ही सत्य परिस्थिती आहे.मी पहिल्यापासून सांगतोय कि महाराष्ट्रात तीन पक्षांची झालेली आघाडी ही अनैसर्गिक आहे. अशा प्रकारची ही आघाडी कधी चालू शकत नाही, असं सांगत फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारला फटकारले.
महत्त्वाच्या बातम्या
- भावना गवळी यांच्या संस्थेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचीही ईडीकडून चौकशी ?
- राज्यकर्ते अराजकता माजवत आहेत आणि जनता असहाय्य आहे, न्याय कुणाकडे मागावा ?
- महंत नरेंद्र गिरी प्रकरणात मी दोषी असल्यास मला कायद्याप्रमाणे शिक्षा द्या – आनंद गिरी
- चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही; नाना पटोले यांचा घणाघात
- महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या ? पोस्टमार्टमच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

