🕒 1 min read
सोलापूर : सरपंच कोणत्याही पक्षाचा असून द्या, तो सर्वांना सोबत घेऊन जाणारा असावा. आजच्या काळात पद, पैसा, बुद्धीला किंमत नाही तर तुम्ही तुमच्या सोबत किती जणाला घेऊन कामकरता याला किंमत आहे. सर्वांना सोबत घेऊन कामकेले तरच गाव समृद्ध होणार आहे. सोलापूर सोशल फौंडेशनने हेच काम करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या या चांगल्या कामात सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांनी सहभाग नोंदवावा आणि आपल्या गावासह संपूर्ण राज्याला समृद्ध बनवावे, असे आवाहन पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले.
सोलापूर सोशल फौंडेशनच्यावतीने छ. रंगभवन कार्यालयात आयोजित समृद्ध गाव जिल्हास्तरीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरपंच पेरे-पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सुभाष देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, आ. सचिन कल्याणशेट्टी,जि. प. सदस्य अण्णाराव बाराचारी, सभापती सोनाली कडते, पाणी फौंडेशनचे डॉ. अविनाश पौळ, अभिजित पाटील, सचिन जाधव, अनिल सहस्त्रबुद्धे, सादिक काझी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पेरे-पाटील पुढे म्हणाले की, सरपंच आणि ग्रामसेवकाने ठरवले तरच समृद्ध गाव होऊ शकते. आजपर्यंत हजारो आमदार, खासदार, जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच झाले, कोट्यवधी रूपये खर्च झाले मात्र म्हणावी तशी गावे समृद्ध झाली नाही. याचे कारण म्हणजे लोकांचा नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे आता नेत्यांनीच लोकांना जे पाहिजे त्यापद्धतीने वागून, त्यांना सोबत घेऊन काम केले तर गावाचा विकास होणार आहे.
आम्हीही पाटोदा गावात तेच केले. लोकांच्या काय गरजा आहेत, त्याला प्राधान्य देऊन कामकेल्यानेच आज पाटोदा गावाचे नाव राज्यात झाले आहे. त्यामुळे गाव समृद्ध करायचे असेल तर सरपंचांनी ग्रामसेवकासह सर्वांना विश्वास घेेऊन कामकरावे. त्याने स्वतःचे अधिकार वापरावेत. शासनाच्या जवळपास ९०० योजना आहेत. त्याचा अभ्यास करावा. गाव समृद्ध झाले तरच राज्य आणि त्यानंतर देश समृद्ध होणार आहे, हे लक्षात ठेवावे.
पाणी फौंडेशनचे डॉ. पोळ म्हणाले की, सरपंचांनी विकासकामे करताना प्राधान्यकमठरवावा. प्रामाणिकपणे कामकरावे. त्यामागे कोणताही हेतू ठेवू नये. सरकारच्या अनेक योजना आहे. त्या समजून घ्यावा. सरकारी अधिकार्यांना जपावे, त्यांचा त्रागा करू नये. सरकारी यंत्रणेत चांगले अधिकारी आहेत, त्यांच्याकडून गोड बोलून कामे करावे. गाव कोणत्या योजनेने मोठे होत नाही तर गावातील लोकांच्या कतृत्वावर मोेठे होते.
प्रत्येक क्षेत्रात जीव ओतून कामकेल्यास यश निश्चित मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी अल्पावधीत सोलापूर सोशल फौंडेशनचे कार्य पाहून भारवून गेल्याचे सांगत त्यांच्या कामाला आपले सहकार्य राहिल, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौंडेशनचे सल्लागार शिवाजी पवार, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन अभिजित पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी फौंडेशनचे सर्व स्टाफ यांच्यासह पदाधिकार्यांनी परिश्रमघेतले.
सरपंचांनी नागरिकाला केंद्रबिंदू मानून कामकरावेः आ. देशमुख
गाव समृद्ध करण्यापूर्वी सर्वांनी स्वतःला समृद्ध करावे. त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य समृद्ध आपोआप होते. गावाच्या विकासासाठी सरपंचांनी पुढाकार घेतला पाहिजे. महिला सरपंचांना मोकळ्या मनाने कामकरू देणे आवश्यक आहे. सरपंचांनी प्रत्येक नागरिकाला केंद्रबिंदू मानून कामकरावे. आपल्याला जनतेने सरपंच केले आहे, त्याची उतराई सर्वांनी केलीच पाहिजे. तसेच गावातल्या गावात युवकांनी संघटित व्हावे, गावातच व्यावसाय सुरू करावा, जेणे करून पैसा गावातच राहिला पाहिजे. महिलांनी केवळ घरकामापुरते मर्यादित न राहता लहान-मोठ्या उद्योगाकडे वळणे आवश्यक आहे. यासाठी सोलापूर सोशल फौंडेशनचे सर्व बाजूने सहकार्य राहिल, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

