Share

‘देवा’ च्या एन्थम साँगला प्रभूदेवाकडून दाद

Published On: 

मुंबई : ‘देवा एक अतरंगी’ हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.. इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित या सिनेमाचे नुकतेच, प्रसिद्ध कॉरियोग्राफर प्रभुदेवा यांच्या ट्वीटद्वारे एन्थम साँग लाँच करण्यात आले.

नृत्यदिग्दर्शनात ‘देवा’ असणा-या प्रभूदेवाने ‘देवा’ चे हे एन्थम सॉंग आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकत, देवाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. अजय गोगावले याचा कमालीचा आवाज या गाण्याला लाभला असून, क्षितीज पटवर्धन लिखित या गाण्याचे अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.

देवाच्या रंगबेरंगी व्यक्तिमत्वाला बोलके करणारे हे गाणे लोकांनादेखील खूप आवडत आहे. मुरली नलप्पा दिग्दर्शित ‘देवा’ हे अतरंगी पात्र अंकुश चौधरीने साकारले असून, विविध रंगानी नटलेल्या या गाण्यात प्रेक्षकदेखील रंगून जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

https://youtu.be/2DG90NMUlhM

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!