मुंबई : भारतीय संघ नुकताच इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. सध्या भारतीय संघ हा विलगीकरणात असुन न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयारी करत आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुचा दुसरा संघ हा पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
बीसीसीआयने श्रीलंका दौर्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. यात काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे आहेत. या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती देण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे.
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या जयदेव उनाडकत आणि राहुल तेवातिया यांची टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही. भारताने इंग्लंड दौऱ्यावरही 20 सदस्यांची टीम पाठवली आहे. याचा अर्थ देशातील टॉप 40 खेळाडूंमध्ये उनाडकत आणि तेवातिया यांचा समावेश नाही. या दोघांकडे मात्र बीसीसीआय निवड समितीने दुर्लक्ष केलं आहे.
मर्यादित षटकांची ही मालिका १३ जुलैपासुन सुरु होउन २५ जुलै पर्यंत चालणार आहे. यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १३ जुलै, दुसरा १६ आणि तिसरा सामना १८ जुलै रोजी होणार आहे. तर टी-२० मालिकेतील पहिला सामना २१ जुलै, दुसरा २३ जुलै आणि अंतिम सामना २५ जुलै रोजी खेळवीण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठी सारेगमप लिट्ल चम्पमध्ये होस्ट म्हणून दिसणार मृण्मयी देशपांडे
- पुणेकर ऋतुराज गायकवाडला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी!
- रितेश- जेनेलिया देशमुखची कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
- श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर ; शिखर धवन असणार कर्णधार तर उपकर्णधार असणार…
- मराठमोळ्या अंदाजात किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स, पहा व्हिडीओ…


